वर्गमित्रांनी व्हॉट्सॲप (whatsapp) ग्रुपवरुन ब्लॉक (Block) केल्याने एका १८ वर्षीय मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. जित असर असं या तरूणाचंं नाव आहे. सांताक्रुझ येथील रहेजा कॉलेजमध्ये जीत बीएमएमच्या पहिल्या वर्षात शिकत होता.
जितच्या वर्गमित्रांचा २०१९ मध्ये नमुने नावाचा एक व्हॉट्सॲप (whatsapp) ग्रुप होता. ग्रुपमधील त्याचे मित्र त्याच्यावर अरेरावी करत होते. ग्रुपमध्ये अनेक मित्रांनी त्याला आत्महत्येचे (Suicide) विविध पर्याय सांगितल्याची धक्कादायक बाब जितच्या वडिलांनी सांगितली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याचे मित्र अश्लिल संवाद करायचे. यावर त्याने आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला ग्रुपमधून काढून टाकले. मात्र त्यानंतरही त्याने मित्रांना पर्सनल मेसेज करून पुन्हा ग्रुपमध्ये घेण्याची विनंती केली होती. जित अभ्यासात हुशार होता. त्यामुळे त्याचे मित्र अभ्यासासाठी त्याला व्हॉट्सॲप (whatsapp) ग्रुपमध्ये सामील करुन घेत व काम झाल्यावर त्याला काढून टाकत होते.
मागील काही दिवसांपासून तो अत्यंत शांत होता. दोन आठवड्यांपासून तो कॉलेजलाही जात नसल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्याचे वडील म्हणाले की, आम्ही त्याला अनेकदा विचारलं. मात्र, ताप आल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर त्याने घरी आत्महत्या (Suicide) केली.
हेही वाचा -