नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे अटकेत


नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे अटकेत
SHARES

कांदिवलीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विपीन यादव (१९) व मोहित यादव (२१) अशी या दोघांची नावे आहे. या दोघांना पोलिसांनी नवी दिल्लीतून अटक केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना गंडवल्याचे तपासात पुढे आले आहे.


सल्लागार कंपनी नियुक्त

मूळचे उत्तरप्रदेशचे राहणारे असलेले हे दोघे ही सध्या नवी मुंबई परिसरात राहतात. तर तक्रारदार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वरळी येथील एच आर विभागात कार्यरत आहेत.  सप्टेंबर २०१८ मध्ये अभिजीत रॉय नावाच्या तरुणाचा ईमेल कंपनीला आला होता. त्यात त्याला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत नोकरी बाबत लेखी बोलावणे आले आहे. हा मेल पाठवणा-या कंपनीने त्यांच्याकडे नोंदणीच्या नावाखाली काही रक्कमही मागितली.  या ईमेलवर तक्रारदाराला संशय आल्यामुळे तो कंपनीला पाठवल्याचे ई-मेलमध्ये नमुद केले. त्यानंतर ३० नोंव्हेंबरला याबाबत तपास करण्यासाठी एका सल्लागार कंपनीला नियुक्त करण्यात आले. 


बनावट लोगो

तिने रॉयच्या पुरवलेल्या भामट्या कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली. त्यावेळी तेथे बोलणा-या पायल गुप्ता नावाच्या महिलेने आपण महिद्रां अँड महिंद्रा कंपनीच्या एचआर विभागातून काम करत असल्याचे सांगितले. तिने नोंदणीसाठी तीन हजार ४०० रुपये भरण्यास सांगितले. तसेच महिंद्रा कंपनीशी मिळता जुळता ईमेल आयडीवर बायोडाटा पाठवण्यास सांगितला. त्यानुसार रक्कम भरल्यानंतर दुस-या दिवशी महिंद्रा कंपनीच्या मिरझापूर येथे नियुक्ती झाल्याचा ईमेल आरोपींनी पाठवला त्यात २५ हजार ५०० रुपये पगाराची नोकरी मिळणार असल्याचे आश्‍वासनही त्यात देण्यात आले होते. तसेच त्यांना १७ हजार रुपये भरण्यासही सांगण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी कंपनीचा बनावट लोगो व नावाचा वापर करण्यता आला. 


आयपी अॅड्रेसने तपास

त्यानंतर महिंद्रा कंपनीने नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीने सर्व प्रकार महिंद्राच्या अधिका-यांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आयपी अॅड्रेसच्या सहाय्याने तपास केला असता तो नवी मुंबईतील राजोरी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नवी दिल्लीला अधिकारी पाठवून दोनही आरोपींना अटक करण्यात आले, अशी माहिती अधिका-याने दिली. 



हेही वाचा - 

बनावट संस्थेच्या नावाने १९४ कोटी उकळले

पबमध्ये विवाहितेशी गैरकृत्य, गुजरातमधील ४ व्यावसायिकांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा