समलैंगिक संबंध लपवण्यासाठी माहिममध्ये हत्या


समलैंगिक संबंध लपवण्यासाठी माहिममध्ये हत्या
SHARES

मुंबईच्या कॉजवे परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कर्नाटकहून मुख्य आरोपी विठ्ठल शिवलिंगप्पा भजंगीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी सूरज उर्फ काळू याची हत्या करण्यात आली होती. समलिंगी संबधाबाबत सूरजनं कुठेही वाच्याता करून नये यासाठी विठ्ठलनं ही हत्या केल्याची कबूली दिली आहे

माहिमच्या भटारखाना परिसरात राहणारा सूरज हा कचरा वेचण्याचं काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याची विठ्ठल याच्यासोबत ओळख झाली. विठ्ठल हा माहिम इथल्या एका हॉटेलमध्ये काम करायचा. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून समलैगिक संबध होते. याची वाच्याता सूरजनं कुठे केल्यास बदनामी होईल. या भीतीनं विठ्ठलनं सूरजच्या हत्येचा कट रचला. सूरजला कॉजवे परिसरात नेत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली

सूरजची ओळख पटल्यानंतर पोलिसांचा तपास माहिमच्या हॉटेलपर्यंत आला. या हॉटेलमध्ये सूरज आणि विठ्ठल काम करत होते. पोलिस चौकशी दरम्यान विठ्ठल अचानक न सांगात गावी निघून गेला असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानुसार माहिम पोलिसांनी दोन पथके विठठल रहात असलेल्या कर्नाटकच्या अफझलपूर इथं पाठवली. त्या ठिकाणी पोलिसांनी विठ्ठलला ताब्यात घेतलं.  दोनवर्षापूर्वी त्यानं आपल्या नातेवाईकाची देखील हत्या केल्याचं तपासात पुढे आलं. याप्रकरणी माहिम पोलिस अधिक तपास करत आहेत


हेही वाचा

सायबर चोरट्यांनी निवृत्त बँक मॅनेजरलाच घातला गंडा

फेसबुक फ्रेंडचं गिफ्ट शिक्षिकेला पडलं महागात


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा