३७० च्या समर्थनासाठी भाजपकडून 'ऑफर'; झाकिर नाईक

‘काश्मीर मुद्द्यावर भारताला समर्थन दिल्यास माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात येतील, असे नाईकने व्हिडिओत म्हटले आहे.

३७० च्या समर्थनासाठी भाजपकडून 'ऑफर'; झाकिर नाईक
SHARES

काश्मिरमध्ये आर्टिकल ३७० हटवल्यानंतर भाजपने समर्थन मिळवण्यासाठी केंद्रातील एका मोठ्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी पाठवल्याचा खळबळजनक आरोप वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक यांनी केला आहे. समर्थन दिल्यास सर्व आरोपातून मुक्त करून भारतात पून्हा परतण्यासाठीचा मार्ग मोकळा करून देण्याच आश्वासन दिल्याचे झाकीर यांनी स्पष्ट केले. एका व्हिडिओद्वारे झाकीर यांनी हे आरोप केले आहेत.  

दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे तसंच प्रक्षोभक भाषणं करून तरूणांची माथी भडकवणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला झाकीर नाईक सध्या फरार आहे. नाईकविरोधात २०१६ मध्ये बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (uapa) अंतर्गत गुन्हा नोंदवत ‘ईडी’ त्याची सर्व खाती गोठवली आहे. तपासात त्याने १९३ कोटींचा मनीलॅण्ड्रींग केल्याचे ही पुढे आले आहे.

हेही वाचाः- वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर

नुकताच झाकीरने एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत त्यावरून भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘काश्मीर मुद्द्यावर भारताला समर्थन दिल्यास माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात येतील, असे नाईकने व्हिडिओत म्हटले आहे. तसेच भारतात परतण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याकडून देण्यात आल्याचे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे. सध्या मलेशियात वास्तव्यास असलेल्या डॉ. झाकिर नाईक याने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी देशभरातील काही मुस्लीम नेते भाजपसोबत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. मात्र, या नेत्यांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे तो म्हणाला.

हेही वाचाः- मध्य रेल्वेच्या 'इतक्या' मेल एक्स्प्रेस चालणार एचओजी तंत्रज्ञानावर

व्हिडिओमध्ये चिथावणीखोर भाषण करून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना उकसवणाऱ्या इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईकने या आधीही अशा प्रकारचे दावे केले होते. इंटरपोलच्या रेकॉर्डवरून त्याची माहिती वगळण्यात आल्याचे त्याने मागील व्हिडीओत सांगितले होते.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा