भुलेश्वरला साकारली ७००० चौ. फुटांची महारांगोळी

पाडव्याच्या निमित्ताने लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बाब म्हणजे दारापुढे दिसणारी रांगोळी. अशीच एक भव्य दिव्य रांगोळी भुलेश्वर जवळील माधवबाग पटांगणात साकारण्यात आली आहे. १४ आणि १५ मार्च असे दोन दिवस ही रांगोळी मुंबईकरांना पाहता येणार आहे.

  • भुलेश्वरला साकारली ७००० चौ. फुटांची महारांगोळी
  • भुलेश्वरला साकारली ७००० चौ. फुटांची महारांगोळी
  • भुलेश्वरला साकारली ७००० चौ. फुटांची महारांगोळी
  • भुलेश्वरला साकारली ७००० चौ. फुटांची महारांगोळी
SHARE

गुढी पाडव्याचा सांस्कृतिक वारसा पुढे चालवत उत्साहात भर घालण्यासाठी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. या शोभायात्रांमध्ये रंग उधळले जातात शुभेच्छांचे, आनंदाचे, लक्षवेधी वेषभूषेचे. अस्सल मराठमोळ्या फेट्यांपासून ते नाकातल्या नथीचा साजश्रृंगार करून प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्ती या सणाचा आनंद घेत असतो. पाडव्याच्या निमित्ताने लक्ष वेधून घेणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दारापुढे दिसणारी रांगोळी. अशीच एक भव्य दिव्य रांगोळी भुलेश्वर जवळील माधवबाग पटांगणात साकारण्यात आली आहे.  १४ आणि १५ मार्च असे दोन दिवस ही रांगोळी मुंबईकरांना पाहता येणार आहे.

 


पाडव्याच्या निमित्तानं महारांगोळी

'स्वास्थ्यरंगआणि 'रंगशारदातर्फे पाडव्याचं औचित्य साधून ७००० चौफुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 'पर्यटन महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर ही महारांगोळी आधारित आहे. स्वास्थ्यरंगचे अध्यक्ष डॉ. तेजस लोखंडे तसंच रंगशारदाचे प्रसाद मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही महारांगोळी साकारण्यात आली आहे.  तब्बल १६ कलाकारांनी सलग ९ तास ही महारांगोळी साकारण्यासाठी मेहनत घेतली आहे. या महारांगोळीसाठी २०० किलो रांगोळी आणि ६०० किलो रंग वापरण्यात आले आहेत. महारांगोळीचं प्रदर्शन १४ आणि १५ मार्च असे दोन दिवस रात्री ९ वाजेपर्यंत पाहता येणार आहेगिरगावचा पाडवा

'स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान' तर्फे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात गिरगावचा पाडवा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. १८ मार्च म्हणजेच रविवारी सकाळी ८ वाजता गणेश मंदिर इथून स्वागत यात्रेचा प्रारंभ होईल. स्वागत यात्रेचं हे १६ वं वर्ष असून 'पर्यटन महाराष्ट्राचे' या विषयावर यात्रा आधारित आहे. 'अविस्मरणीय अनुभूतींची, भ्रमंती महाराष्ट्राची' अशी यात्रेची संकल्पना आहे. या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचं दर्शन घडवण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहेस्वागत यात्रेची वैशिष्ट्ये

प्रजासत्ताकदिनी राजपथावरील महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक चित्ररथ, घारापुरी लेणीवर आधारित चित्ररथ, समर्थ रामदास स्वामी यांची २२ फूटी पर्यावरणस्नेही प्रतिकृती, भगवान परशुराम यांची २५ फूट प्रतिकृती, श्री खंडोबारायांचा चलचित्रासहित देखावा, नयनरम्य रांगोळ्या, प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके ही स्वागत यात्रेची यावर्षीची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय गिरगांव ध्वजपथक आणि गजर ढोल ताशा पथक १२०० युवक-युवतींसोबत सहभागी होणार आहेत.  


संबंधित विषय
ताज्या बातम्या