घाटकोपरच्या पोलिसाचा सन्मान

 Ghatkopar
घाटकोपरच्या पोलिसाचा सन्मान
घाटकोपरच्या पोलिसाचा सन्मान
See all

घाटकोपर - चिरागनगर पोलीस ठाण्यातले वरिष्ठ निरिक्षक व्यंकट पाटील यांना सांगली रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 'घात' आणि 'हरवलेला पोलीस' या दोन कादंबऱ्या व्यंकट पाटील यांनी लिहिल्या आहेत. 'घात' या कादंबरीत पोलीस खात्यातील त्यांचा अनुभव व्यक्त करण्यात आलाय. तर पंधरा रंजक पोलिसी कथा 'घर हरवलेला पोलीस' कथासंग्रहात आहेत.

सांगली जिल्हा विकास संघ 2016 आयोजित चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्यंकट पाटील त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बदल हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रितू तावडे यांनी व्यंकट पाटील यांचं अभिनंदन केलं.

Loading Comments