Advertisement

अंगारकी संकष्टी : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट

अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं लाखो गणेशभक्त विविध गणपती मंदिरात गर्दी करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

अंगारकी संकष्टी : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट
SHARES

आषाढ कृष्ण चतुर्थी ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हणून ओळखली जाते. आज २७ जुलै रोजी ही चतुर्थी असून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं लाखो गणेशभक्त विविध गणपती मंदिरात गर्दी करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरबाहेरच अनेक भाविक दर्शन घेऊन परतत आहेत.

२४ तास ऑनलाईन दर्शन

दरवर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील दादर परिसरात असलेले प्रसिद्ध सिद्धीविनायक गणपती मंदिरात अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळत असे. मात्र कोरोनामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना 24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. 

कोविड-19 संसर्ग निर्बंध नियमावलीनुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे.हेही वाचा -

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा