धूम चेंबूर महोत्सवाची


  • धूम चेंबूर महोत्सवाची
SHARE

मुंबई शहरातील एक महत्वाचे उपनगर म्हणजे चेंबूर. या चेंबूर उपनगराची ऐतिहासिक माहिती सर्वांसमोर यावी, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून चेंबूरमध्ये 'चेंबूर महोत्सवा' चे आयोजन करण्यात येते. चेंबूरचे शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, यंदाचे महोत्सवाचे  6 वे वर्ष आहे. 

यावर्षी देखील 20 एप्रिल ते 24 एप्रिल 2017 या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात योगा शिबीर,रांगोळी स्पर्धा,भजन,चित्रकला स्पर्धा,विविध खेळांच्या स्पर्धा,चेंबूर मधील आर.के.स्टुडियो तसेच विविध प्रसिद्ध ठिकाणांची ऐतिहासिक माहितीपर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 

चेंबूर गॉट टॅलेंट,चेंबूर मॅरेथॉन,समूह नृत्य स्पर्धा,जनरल नॉलेज,लहान मुलांसाठी तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन या चार दिवसात करण्यात येणार आहे. काळा घोडा फेस्टिवल तसेच वांद्रे फेस्टिवल प्रमाणे चेंबूरकराना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या