Advertisement

पोलीस पत्नींकडून वटपौर्णिमा घरीच साजरी करण्याचं आवाहन

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी महिलांनी घरीच राहण पसंत केलं आहे.

पोलीस पत्नींकडून वटपौर्णिमा घरीच साजरी करण्याचं आवाहन
SHARES

यंदा मुंबईकर कोरोनाचं सावट असल्यानं कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी महिलांनी घरीच राहण पसंत केलं आहे. त्याशिवाय, अनेक महिलांनी आपली परंपरा मोडू नये यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. वरळीतील बीडीडी चाळतील एका इमारतीत मजल्यावरच अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. ही वटपोर्णिमी पोलीस पत्नींकडून साजरी करण्यात आली. तसंच, त्यांनी इतर महिलांनाही घरीच वटपौर्णिमा करण्याचे आवाहन केलं आहे.


देशात गेल्या अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा लॉकाडाऊन घोषित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर वरळी बीडीडी चाळीतील पोलीस लाईनमधील महिलांनी थेट मजल्यावरच वटपौर्णिमा साजरी केली. वटपोर्णिमा साजरी करताना महिलांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत वटपौर्णिमा साजरी केली. इतर महिलांनाही घरीच वटपौर्णिमा साजरे करण्याचे आवाहन पोलीस पत्नींनी केले आहे.

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मोठ्या उत्साहान, घरी गोड पदार्थाचं जेवण करत ही वटपोर्णिमा साजरी केली जाते.



हेही वाचा -

बेस्टच्या २०० कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

राज्यात अनलॉकडाऊन १.० ला शुक्रवारपासून सुरूवात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा