Advertisement

मंदिरात सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ

गेल्या महिनाभरात मंदिरे, दर्गा याठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली असून इथं अंतर नियमांचे पालन होत नसल्याची माहिती समोर येत आहे.

मंदिरात सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली देवस्थान नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. कोरोना हा जीवघेणा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळं सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन, तोंडाला मास्क लावणं बंधनकारक केलं आहे. असं असलं तरी मंदिरातील देवाच्या गाभाऱ्यात भाविकांना याचा विसर पडत आहे. गेल्या महिनाभरात मंदिरे, दर्गा याठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली असून इथं अंतर नियमांचे पालन होत नसल्याची माहिती समोर येत आहे.

लॉकडाऊनमुळं मंदिरांना लागलेले कुलूप ८ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आले. सुरुवातीच्या काळात भाविकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. आता मार्गशीर्ष महिन्यादरम्यान मंदिरातील गर्दी वाढत गेली. संपूर्ण मार्गशीर्ष महिना आणि त्यानंतर मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिर, तसेच हाजीअली दर्गा येथे भाविक आवर्जून भेट देऊ लागले आहेत. परंतु या वाढत्या गर्दीत सामाजिक अंतराच्या नियमाचे भाविकांकडून उल्लंघन होत आहे.

मंदिर प्रशासनाकडून लोकांना विनंती करूनही लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं समजतं. मुंबईतील अनेक मंदिरात भाविक प्रचंड गर्दी करत आहेत. परिणामी सामाजिक अंतर न ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा