Advertisement

माटुंग्यात आठवा आंतरभारती साहित्य संवाद


माटुंग्यात आठवा आंतरभारती साहित्य संवाद
SHARES

माटुंगा - येथील मैसूर असोसिएशनच्या सभागृहात शुक्रवारी आणि शनिवारी आंतरभारती साहित्य संवाद संमेलन आयोजित करण्यात आले आहे. साहित्याच्या माध्यमातून भारतीय भाषांमध्ये संवाद घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा संवाद आयोजित केलाय. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या हस्ते या संवाद संमेलनाचे उद्घाटन होईल. मराठी आणि कन्नड या भाषांमधील 'अस्वस्थ वर्तमाना'चा वेध या संवाद संमेलनात घेण्यात येईल. दोन्ही भाषांतील नामवंत साहित्यिक या संमेलनात सहभागी होत आहेत.

दोन दिवसीय संवादात प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड भाषेतील मान्यवर साहित्यिक डॉ. सी.एन. रामचंद्रन हे उपस्थित राहाणार आहेत. कन्नड भाषेतील 'बंडाय साहित्य' या विषयावरील चर्चासत्रात डॉ. बी. एन. सुमित्राबाई, डॉ. एस आर विजयशंकर, चंद्रशेखर पलेत्तडी सहभागी होणार आहेत. 'ग्रामीण साहित्यातून प्रकट झालेलं अस्वस्थ वर्तमान' या विषयावरील चर्चेत प्रविण बांदेकर, कृष्णात खोत, श्रीकांत देशमुख सहभागी होणार आहेत.

मराठी कन्नड कवितांच्या कार्यक्रमात वीरधवल परब, किरण येले, सुचेता खल्लाळ, एच एन आरती, अब्दुल रशिद, विवेक शानभाग सहभागी होणार आहेत. याशिवाय संगीतकार मिलींद जोशी यांची विद्रोही गाणी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि पुष्पा भावे यांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रमाचा समारोप होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा