नागरीनिवारा - दिंडोशी येथील नागरीनिवारा परिषद झोन 1-2 मध्ये जीवनगाण्यांच्या मैफिलीने दिवाळी पहाट रंगली. अभिनेते तुषार दळवी, संपदा कुलकर्णी यांच्या दिलखुलास निवेदनामुळे कार्यक्रमाला रंगत आली. रवींद्र साठे, उत्तरा केळकर, सोनाली कर्णिक, श्रीकांत नारायण, चिंतामणी सोहोनी, कविता निकम या कलाकारांनी सदाबहार गाण्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार, उपमहापौर अलका केरकर यांची विशेष उपस्थिती होती. भाजपाचे दिंडोशी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजन सिंग, माजी नगरसेविका सुचित्रा नाईक, महिला मोर्चा अध्यक्षा भारती बेंडे, कोकण विकास परिषदेचे अध्यक्ष संकेत नलावडे, उपाध्यक्ष सचिन सावंत आदींचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.