काळाघोडा पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण


SHARE

काळाघोडा - फोर्ट मधील काळा घोडा परिसराला त्याचे गतवैभव परत मिळाले आहे. या परिसराच्या नावाला शोभेल असा काळाघोड्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. मंगळवारी या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

25 फूट उंच असलेला हा पुतळा ब्रॉंझ धातूने बनवला आहे. शिल्पकार श्रीहरी भोसले यांनी हा पुतळा बनवला असून, वास्तूविशारद अल्फाज मिलर यांनी पुतळा डिझायन केला आहे. पूर्वी येथे ब्रिटिशकालीन काळाघोड्याचा पुतळा होता. मात्र पालिकेने ब्रिटीशकालीन सर्व पुतळे काढताना तो सुद्धा काढला होता. त्यानंतर गेले काही वर्ष काळा घोडा असोसिएशनने महापालिकेकडे येथे पुतळा उभारण्याची मागणी केली होती, त्याला महापालिकेने मंजुरी देत अखेर हा पुतळा उभारला. यावेळी खासदार अरविंद सावंत, महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त पालिका आयुक्त पल्लवी दराडे, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, शिल्पकार श्रीहरी भोसले, ए वॉर्ड पालिका विभागाचे सहायक आयुक्त किरण दीघावकर आणि काळाघोडा असोसिएशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या