Advertisement

'ख्यालों की कश्ती' मध्ये कवितांची मैफल


'ख्यालों की कश्ती' मध्ये कवितांची मैफल
SHARES

वांद्रे - फेसबूकवर अनेक जण आपले विचार, कविता मांडताना दिसतात. मात्र आता याच तरुण-तरुणींना कविता मांडता याव्यात यासाठी काही मित्रांनी मिळून फेसबूकवर 'ख्यालों की कश्ती' नावाचं पेज तयार केलं आहे. 

कुणाल झावर आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे पेज तयार केले असून, या पेजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपल्या कवितांद्वारे व्यक्त होणाऱ्या अनेक कवींना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांचं हे निमंत्रण स्विकारून अनेक नवकवींनी रविवारी वांद्रे येथील पिकोक लाईफ येथे सहभागी होत कविता सादर केल्या. अनेक नवं कवींना लोकांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून ते निराशेपोटी कविता-शायरी लिहिण्याचा आपला छंद सोडून देतात हेच ओळखून ही नवीन संकल्पना शोधून काढल्याचे कुणाल याने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा