Advertisement

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मंदिरात गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची पूजा करण्यासाठी भाविकांनी शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी केली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मंदिरात गर्दी
SHARES

महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची पूजा करण्यासाठी भाविकांनी शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी केली आहे. मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात रांग लावण्यास सुरूवात केली आहे.

भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले शंकराचे मंदिर यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त खुले करण्यात आले आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष मंदिरात जाऊन भगवान शंकराची पुजा करायला मिळत असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

शंकराच्या मंदिराबाहेर अनेक भाविक शंकराची गाणी म्हणत असून, 'जय शिव शंकर शंभो' अशा घोषणा देत आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त मुंबईसह राज्यभरातील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. मुंबईत बाबुलनाथ मंदिर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर कोकणात कुणकेश्वर येथील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी ओडिशा येथील समुद्रकिनाऱ्यावर भगवान शिवाची आकर्षक मूर्ती तयार केली आहे. यासाठी त्यांनी २३ हजारांहून अधिक रुद्राक्षांचा वापर केला.

महाशिवरात्री

माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येणारी शिवरात्री 'महाशिवरात्री' म्हणून साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला 'शिवरात्री' म्हणतात.

दरवर्षी सुमारे १२ शिवरात्री येतात, या १२ शिवरात्रींमध्ये येणारी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकराने या दिवशी तिला पत्नी म्हणून स्वीकारले, असं बोललं जातं. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा