चिंचोली बंदरमध्ये साकारला सिंधुदुर्ग किल्ला


  • चिंचोली बंदरमध्ये साकारला सिंधुदुर्ग किल्ला
  • चिंचोली बंदरमध्ये साकारला सिंधुदुर्ग किल्ला
SHARE

चिंचोली बंदर - मालाडच्या रणझुंजार ढोलताशा पथकातील शिलेदारांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. चिंचोली बंदर येथील मनसे गड क्रमांक 50 येथे ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मालाडमधील रहिवासी तसंच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचीही सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी होते आहे. आपली संस्कृती आणि गड किल्ल्यांची माहिती सामान्यांपर्यंत पोहचवण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे, असं मनसे शाखाप्रमुख हरेश साळवी यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या