Advertisement

वडाळ्याच्या राम मंदिरात नागपंचमीचा उत्सव


वडाळ्याच्या राम मंदिरात नागपंचमीचा उत्सव
SHARES

नागपंचमीनिमित्त गुरुवारी 27 जुलै रोजी वडाळा येथील राम मंदिरात सकाळी 8 वाजल्यापासून पूजाअर्जा करण्यात आली. 1955 साली बांधण्यात आलेल्या या राम मंदिरात गेल्या 20 वर्षांपासून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो, असे मंदिराचे जनरल सेक्रेटरी उल्हास कामत यांनी सांगितले.


राम मंदिरात प्रत्येक सण साजरा केला जातो. नागपंचमीलाही तेवढेच महत्त्व आहे. नागपंचमी म्हणजे नागदेवतेचा दिवस. नागपंचमीनिमित्त ही धार्मिक पूजा केली जाते. आलेल्या भाविकांचे सर्व दोष दूर होतात.

उल्हास कामत, जनरल सेक्रेटरी

हे राम मंदिर फार जुने असल्यामुळे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दरदिवशी येथे गर्दी पाहायला मिळते. नागपंचमीला दरवर्षीप्रमाणे यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा