Advertisement

हा नक्की कितवा प्रजासत्ताक दिन? सरकारी विभागानं केली 'ही' चूक!

आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सोडा, पण राज्य सरकारच्याच एका विभागाला देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे हे माहीत नसावं? आणि फक्त माहितीच नाही, तर चुकीचा दिन छापलेलं पत्र राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याइतपत पराक्रम करण्यात आला आहे.

हा नक्की कितवा प्रजासत्ताक दिन? सरकारी विभागानं केली 'ही' चूक!
SHARES

दरवर्षी जानेवारी महिन्यात देशभरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु असते. कुठे संचलनाचा सराव, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज उभारणी. हे सगळं एकीकडे सुरु असताना 'हा कितवा प्रजासत्ताक दिन' आहे? असं जर कुणाला विचारलं, तर बहुतांश जणांना ते पटकन सांगताच येणार नाही. तुम्हाला तरी सांगता येईल का हो?


जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात चूक

आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सोडा, पण राज्य सरकारच्याच एका विभागाला देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे हे माहीत नसावं? आणि फक्त माहितीच नाही, तर चुकीचा दिन छापलेलं पत्र राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याइतपत पराक्रम करण्यात आला आहे.


काय घडलं?

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याबाबत राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक पाठवण्यात आलं आहे. मात्र, यामध्ये नेमका कितवा प्रजासत्ताक दिन आहे, यामध्येच घोळ घालण्यात आला आहे. या परिपत्रकामध्ये यंदाचा ६८वा प्रजासत्ताक दिन असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

शासकीय परिपत्रकातच जर अशी चूक असेल, तर आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना काय सांगायचं? असा प्रश्न आम्हाला पडलाय.

राजेश पंड्या, शिक्षक, फातीमादेवी शाळा

यापूर्वीही दिल्लीतील संचलनात भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा उल्लेख असलेला फलक लावण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली होती, असंही राजेश पंड्या यांनी सांगितलं.


नक्की कितवा प्रजासत्ताक दिन?

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या बाबतीत बरेच जण म्हणतायत की हा ६८वा प्रजासत्ताक दिन आहे. तर अनेक जण तो ६९वा प्रजासत्ताक दिन असल्याचं सांगत आहेत. १९५० साली भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यामुळे पहिला प्रजासत्ताक दिन १९५० सालीच साजरा झाला. त्या हिशोबाने यंदा ६९वा प्रजासत्ताक दिन आहे.


घोळ होतो कुठे?

स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन, दरवर्षी हा घोळ घातला जातो. प्रजासत्ताक दिनाबद्दलच बोलायचं झालं, तर भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनून ६८ वर्ष उलटली आहेत. पण दिवसांची मोजणी करायची झाली, तर तो ६९वा दिन आहे. हीच बाब स्वातंत्र्य दिनालाही लागू होते.

सरकारी विभागांमध्येही माणसंच काम करतात असा एक युक्तिवाद यासाठी केला जातो. मात्र, कितीही झालं, तरी अशा गोष्टींमध्ये पूर्ण काळजी घेऊनच पुढील कार्यवाही केली जावी ही अपेक्षा असते. आणि सरकारी विभागांनी ती घ्यायलाच हवी. नाहीतर यासाठी लोकांना दोष देता येणार नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा