शिवस्मारक होणार जगातील सर्वात उंच स्मारक


SHARE

मुंबई - मुंबईतील अरबी समुद्रात बनवण्यात येणारं शिवस्मारक जगातील सर्वाधिक उंच व्हावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. 192 मीटरवरून 210 मीटर एवढे उंच हे शिवस्मारक असावं असा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं विनायक मेटे यांनी स्पष्ट केलंय. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जगातील सर्वाधिक उंच स्मारक म्हणून शिवस्मारक ओळखलं जाईल.

याविषयी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणं ही शिवप्रेमींची इच्छा आहे. तसंच शिवस्मारकाचे टेंडर काढण्यात आले असून 3 कॉन्ट्रॅक्टर देखील स्वइच्छेने हे स्मारक बांधण्यासाठी पुढे आले आहेत. कंत्राटदारांची 15 दिवसांत टेक्निकली पाहणी पूर्ण होईल. तसंच राज्य सरकारने 3600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2500 कोटी पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या