Advertisement

मंगळागौरच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक


मंगळागौरच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक
SHARES

श्रावण सुरू झाल्यानंतर नवविवाहित तरुणींसाठी मंगळागौर ही एक पर्वणीच असते. लग्न झालेल्या पहिल्या पाच वर्षांपर्यंत या मंगळागौरीचे व्रत केले जाते. श्रावणातल्या दर मंगळवारी पूजाविधी केल्यानंतर विविध सांस्कृतिक खेळ आणि गाणी म्हणून जागर केला जातो. त्यामुळे महिलावर्गासाठी मंगळागौर हा सण महत्त्वाचा मानला जातो.

घाटकोपरच्या पंतनगरमध्ये मात्र लहान-लहान मुलींनी सांस्कृतिक खेळ आणि गाणी म्हणत मंगळागौर साजरी केला. विशेष म्हणजे घाटकोपरमधील शिवाजी संस्थेच्या वतीने मंगळवारी संध्याकाळी 'मंगळागौरी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सिनियर के. जी. पासून ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी मंगळागौर आनंद आणि जल्लोषात साजरी केली. यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातल्या 200 हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.


आमची संस्था तब्बल 12 वर्षांपासून मंगळागौरीच्या कार्यक्रमातून शाळेतील भावी पिढीवर पारंपरिक संस्कृतीचे संस्कार करत आहे. हा फक्त खेळ नाही, तर महिलांसाठीचा एक व्यायाम प्रकार आहे.

शरद फाटक, चिटणीस, शिवाजी शिक्षण संस्था

पारंपरिक नऊवारी साडी आणि दागिने परिधान केलेल्या 3 ते 4 वर्षांच्या चिमुकलींचा सहभाग हा विशेष उल्लेखनीय होता. या चिमुकल्यांनी मंगळगौरीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सोबतच 'घागर घुमु दे घुमु दे', 'नाच गं घुमा', आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या गाण्यांवर नृत्य सादर केले. तसेच झिम्मा, फुगडी, किस बाई किस, लाट्या बाई लाट्या, सई बाईचा कोंबडा यांसारखे बरेच सांस्कृतिक खेळ खेळले.


मंगळागौरचे महत्त्व भावी पिढीला पटवून देणे गरजेचे आहे. मराठी संस्कृती पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरावी, श्रावण महिना आणि सणांची माहिती मिळावी म्हणून मागच्या 12 वर्षांपासून शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

फरिदा सनदे, मुख्याध्यापिका, शिवाजी शिक्षण संस्था


पूर्वीची मंगळागौर

श्रावण महिन्यात प्रत्येक माहेरवाशीण मंगळागौरीसाठी माहेरी येते असे. यातून सर्व मैत्रिणी एकत्रित येऊन स्वत:साठी वेळ काढत होत्या. पारंपरिक मंगळागौर कार्यक्रात झिम्मा, फुगडी, बसफुगडी, पिंगा, कोंबडा आणि रिंगण हे खेळ खेळले जातात.त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना पण, माहेरवाशीणीचा ताणतणाव दूर होतो.



हेही वाचा -

श्रावण मासी..हर्ष मानसी!

श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा