श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर

Mumbai
श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर
श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर
श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर
श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर
श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर
See all
मुंबई  -  

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे... श्रावण महिना म्हणजे पावसाळ्यातील ऊन-पावसाचा खेळ!  पावसाळ्यातील वातावरण हे दमट, ओलसर आणि त्यामुळे आरोग्यदायी नसते. अशा वातावरणात आरोग्यदायी आणि रुचकर आहार घेण्याची सर्वांचीच गरज असते. निसर्गतःच म्हणजे वातावरणामुळे शरीरात वातदोष वाढतो आणि भूकही मंदावलेली असते. त्यात, मांसाहारी पदार्थ तर पचनक्रिया बिघडवू शकतात. म्हणूनच, श्रावणात शाकाहार कधीही चांगला!

 

तसाही, पावसाळ्यात पचायला हलका असाच आहार घ्यावा. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने या चार महिन्यात आंबट, खारट आणि मधूर पदार्थांचे सेवन करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाने आपल्याला अशा भाज्या उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यात आंबट, खारट आणि मधूर असे सर्व गुणधर्म आहेत. श्रावणात जर तुम्ही बाजारात फेरफटका मारला तर तुम्हाला नवनवीन रानभाज्या बघायला मिळतील. मुंबई आणि ठाण्यातल्या बाजारात पावसाळी रानभाज्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. अशाच काही खास पावसाळी पण श्रावण स्पेशल भाज्यांची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.


भुईआवळी

भुईआवळी या रोपट्याच्या पानांची आणि फांद्यांची भाजी करतात. या भाजीचे खोड आणि फांद्या गोलाकार असतात. खोडाला बुंध्यापासून फांद्या फुटतात. भुईआवळी शेतात, बागेत,पडीक जमिनीवर आढळते. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान भुईआवळीस फुले, फळे येतातभुईआवळीचे औषधी गुणधर्म

 • या वनस्पतीत फायलेनथीन नावाचे द्रव्य आहे
 • कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर देतात.
 • लघवी कमी होणे, मुतखडा, जंतुसंसर्ग आदी विकारांमध्ये भुईआवळीच्या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो
 • उच्च रक्तदाबचा त्रास असेल तर या भाजीचे सेवन करावे.


इंग्रजी नाव - फायलॅन्थस एमरस (PhyllanthusAmarus)


भारंगी

भारंगीच्या पानांची आणि फुलांचीही भाजी करतात. या वनस्पतीच्या फांद्या चौकनी असतात. तर पाने साधी, समोरासमोर आणि कडा कातरलेल्या असतात.फांदीच्या टोकावर पांढरी आणि निळसर फुले असतात. भारंगीची झुडपे डोंगर उतारावर, जंगलात आणि शेतात आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात


भारंगीचे औषधी गुणधर्म

 • भारंगीच्या पानांची भाजी दमा या विकारावर फायदेशीर
 • खोकला, ताप आणि कफ या विकारांवर रामबाण उपाय. 
 • पचनक्रिया बिघडली तर या भाजीचे सेवन करा.
 • भारंगीची पाने शिजवून त्याचे पाणी गाळून प्यायल्यास पोटातील जंत नष्ट होतात.


इंग्रजी नाव - क्लेरोडेंड्रम सिरेटम (Clerodendrum Serratum)

हिंदी नाव - भारंगी


हादगा

हादग्याच्या फुलांची आणि शेंगांची भाजी केली जाते. हादग्याच्या लहान वृक्षांची लागवड शेतात किंवा बांधावर करतात. हादग्याला अगस्ता या नावाने देखील ओळखले जाते. हादग्याची फुले लंबगोलाकार आणि आकाराने मोठी असतात. ही फुले पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची असतात. फुले चवीला थोडी कडवट आणि तुरट असतात. हादग्याच्या एका शेंगेत 15 ते20 तपकिरी रंगाच्या बिया असतात. हादग्याला सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान फुले आणि फळे येतात.हादगाचे औषधी गुणधर्म

 • वात, कफ आणि पित्तदोषांत फुलांची भाजी उपयोगी. 
 • भूक न लागणे, पचनक्रिया बिघडणे यावर गुणकारी.
 • पाळी अनियमित असेल, अंगावरून कमी जात असेल, तर या भाजीच्या सेवनाने समस्या दूर होतात.
 • ज्वर, कफ यावरही हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त
 • हादग्याच्या खोडाचे साल, पाने आणि मूळांचा वापर विविध औषधे बनवण्यासाठी होतो.  


इंग्रजी नाव - सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा (Sesbania Grandiflora)

हिंदी नाव - अगस्ति


काटेमाठ

काटेमाठच्या कोवळ्या भाज्या आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. पावसाळ्यात ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला आणि शेतात काटेमाठ ही वनस्पती आढळते. काटेमाठ या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फुले आणि फळे येतात. तांदुळजा या नावाने देखील ही वनस्पती ओळखली जातेकाटेमाठचे औषधी गुणधर्म

 • काटेमाठची भाजी पौष्टिक आणि पचनास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते.
 • बाळंतिणीच्या जेवणात ही भाजी असल्यास अंगावरील दूध वाढण्यास मदत होते
 • गर्भपात होण्याचे टळते आणि गर्भाचे नीट पोषण होते.  
 • गर्भाशय शैथिल्य, सूज यावरही काटेमाठची भाजी उपयुक्त
 • पित्त, रक्तविकार, मूळव्याध या विकारांवर काटेमाठ गुणकारी


इंग्रजी नाव - स्पायनी अमरंथ (Spiny Amaranth) 

हिंदी नाव - कांटा चौलाई


चुका

चुक्याच्या पानांची, कोवळ्या फांद्यांची आणि खोडांची भाजी केली जाते. ओसाड जमिनीवर, बागेत आणि शेतात या वनस्पतीची वाढ होते. जानेवारी ते मार्च महिन्यात या वनस्पतीला फुले, फळे येतात. चुका ही भाजी अतिशय रुचकर असते त्यामुळे या भाजीला रोचनी नावाने सुद्धा ओळखले जाते. चुकाची भाजी आंबट-गोड असते.चुकाचे औषधी गुणधर्म

 • भाजीमुळे वातदोष कमी करते.
 • भाजी पचनास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते
 • चुका थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह अशा विकारांमध्ये फायदेशीर
 • हृदयाच्या आजारांवर, छातीत दुखणे, दमा, मूळव्याध आजारांवर फायदेशीर
 • डोकेदुखीवर चुका आणि कांद्याचा रस चोळावा
 • चुक्याच्या पानांचा रस दातदुखीवर उपयुक्त आहे.


इंग्रजी नाव 

डॉकविड (dockweed or dock weed)


वसू

वसूच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. वसू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे. ओसाड पडिक जमिनीवर किंवा शेतात हमखास आढळते. या वनस्पतीची पाने गोलाकार असतात. तर फळे पानाच्या फुगीर देठांनी झाकलेली असतात. वसूचे मूळ ताजेपणी गोडसर पण सुकल्यावर कडू लागते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फुले येतातवसूचे औषधी गुणधर्म

 • दमा आणि खोकला या विकारांमध्ये वसूची भाजी उपयुक्त
 • शरीरातील वात कमी करण्यासाठी फायदेशीर
 • यकृताचे विकार, त्वचारोग यावर वसूची भाजी गुणकारी
 • गरोदरपणात वसूची भाजी आणि मूळ खाऊ नये
 • पांडुरोगात वसूची भाजी लाभदायी आहे.


इंग्रजी नाव - डेझर्ट हॉर्स पर्सलेन किंवा ब्लॅक पीगवीड (desert horsepurslaneor black pigweed)

हिंदी नाव - खाप्रा

गुळवेल

गुळवेलच्या पानांची भाजी करतात. गुळवेलीच्या मोठ्या वेली झाडांवर आणि कुंपणांवर पसरलेल्या असतात. याची पाने हृदयाच्या आकाराची आणि गुळगुळीत असतात. गुळवेलीला नोव्हेंबर ते जून कालावधीत फुले, फळे येतात. वारुडवेल, अमृतवेल आणि अमृतवल्ली या नावांनी देखील ही वनस्पती ओळखली जाते.  गुळवेल औषधी गुणधर्म

 • गुळवेल मधुमेहावर फायदेशीर.
 • कावीळमध्ये या भाजीचे सेवन करावे.
 • सर्दी, खोकला आणि ताप यावर गुळवेलची भाजी गुणकारी.
 • गुळवेलच्या भाजीमुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.
 • भाजीच्या सेवनाने भूक वाढतेे. तसेच पचनक्रिया सुधारते.
 • वारंवार तहान लागणे, जळजळ होणे, वात यावर गुणकारी.


इंग्रजी नाव - हार्ट लिव्हड मूनसीड (heart-leaved moonseed)

हिंदी नाव - गिलोड

बांबू

बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे.महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट, खानदेश आणि विदर्भात आढळते. केरळच्या जंगलात बांबू नैसर्गिक वाढवला जातो. ओढ्यांच्या आणि नद्यांच्या काठांवर बांबू वाढतो. बांबूचे वृक्ष हे सरळ आणि उंच वाढते. त्याची पाने लांबट, टोकाकडे निमुळती आणि खरखरीत असतात. बांबूच्या बियांना वेणुज म्हणतात. कासेट, काष्ठी आणि कळक या नावाने देखील बांबू ओळखला जातो. बांबू ही तंतूमय वनस्पती आहे.शिवाय ती क्षारमुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. बांबूचे मूळ, पाने, बिया औषधात वापरतात.बांबूचे औषधी गुणधर्म

 • मासिक पाळी नियमित येण्यासाठी बांबूची भाजी उपयुक्त
 • बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात.
 • भाजीमुळे भूक आणि पचनशक्ती वाढते.
 • बांबू पिकला की खोडाच्या पेरात एक स्राव जमा होऊ लागतो. त्यास वंशलोचन म्हणतात. 'वंशलोचन' हे दम्यावरील उत्तम औषध आहे.  
 • बांबूच्या मुळांचा रस स्थूलता आणि मधुमेह या विकारांवर रामबाण उपाय


इंग्रजी नाव - Bambo

हिंदी नाव - बांस

चिवळ

चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत आणि बागेत तण म्हणून वाढते. ही वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. या वनस्पतीच्या खोडांचा, पानांचा आणि फांद्यांचा आकार लहान असतो. रानघोळ, चिवळी आणि खाटेचौनाळ अशी चिवळ या भाजीची स्थानिक नावे आहेत.चिवळचे औषधी गुणधर्म

 • चिवळीची भाजी शितल असून रक्तशुद्धी करणारी आहे.
 • रक्तपित्तात ही भाजी लाभदायी
 • या भाजीच्या सेवनामुळे उष्णता कमी होऊन लघवीला साफ होते.
 • भाजीत कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आसल्याचे देखील सिद्ध झाले आहे.
 • चिवळीची भाजी मूळव्याधीवर गुणकारी


इंग्रजी नाव - चिकनवीड( chickenweed)

हिंदी नाव - छोटा नोनियाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.