लेखकापेक्षा वाचक सुसंस्कृत असणे गरजेचे


SHARE

दादर - लेखक ही वाचकांची उपजात आहे. लेखकापेक्षा वाचक सुसंस्कृत असला की लेखक देखील सुसंस्कृत होतो असे प्रतिपादन साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य अकादमी स्थापना दिवसानिमित्त शुक्रवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केलं.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक भाऊ पाध्ये यांच्या जीवन आणि साहित्यकृतींचा मागोवा ‘विशेष माझ्या दृष्टीने’ या कार्यक्रमांतर्गत दादर (पू.) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्गावरील साहित्य अकादमीच्या सभागृहात संयोजक भालचंद्र नेमाडे यांनी घेतला. ते म्हणाले की पाध्ये हे एक चांगले साहित्यिक होते. मात्र त्या काळी त्यांच्या साहित्याला चांगला प्रकाशक मिळाला नाही. त्याचबरोबर समीक्षण करणारे वर्तुळ देखील त्यांना मिळाले नसल्याची खंत नेमाडे यांनी व्यक्त केली असून मराठी साहित्यिकांमध्ये आजही असा संघ नाही जो जगात राजदूत म्हणून साहित्यांसाठी कार्य करेल. या वेळी अनेक साहित्यिक, लेखक उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या