Advertisement

अंध मुलामुलींनी साकारला बाप्पासाठी सेट!


SHARES

आपण सगळेच आपल्या लाडक्या बाप्पासाठी काहीतरी वेगळी सजावट करण्याचा प्रयत्न करतो. तशीच वेगळी सजावट मुंबईतल्या डिलाईल रोड येथील पंचगंगा सोसायटीच्या गणपती मंडळाने केली आहे.सर्वात महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ती सर्व सजावट अंध आणि अपंग मुलामुलींच्या हातातून साकार झालेली आहे.हे वाचून किंवा ऐकून कोणालाच ह्यावर विश्वास बसणार नाही पण तरीही हे खरं आहे. व्यवसायाने आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटील नावाच्या तरुणाने पुढाकार घेऊन ह्या सर्व मुलामुलींना एकत्र घेऊन ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.

एकूण ४० लोक ज्यात मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच अंध,अपंग,तृतीयपंथी,कारपेंटर अशा लोकांचा समावेश होता.अवघ्या २४ तासात ह्या सर्वानी अतिशय सुरेख अशी सजावट तयार केली आहे ज्यात त्यांनी 'गणपती बाप्पा मोरया चला वीज वाचवूया असा' असा संदेश ही दिलाय.तसेच ह्या सजावटीत त्यांनी सौरऊर्जा, चुंबकीयऊर्जा,फळभाज्या व जलऊर्जाद्वारे कशाप्रकारे विजेची निर्मिती करता येईल व वीज वाचवता येईल असा संदेश देणारे वेगवेगळ्या स्वरूपातील आठ बाप्पा साकारण्यात आले आहेत.

मंडळाने देखाव्यातील भिंतींवर ब्रेललिपि मध्ये संदेश लिहले आहेत.विषारी वायू वातावरणात मिसळल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो याचा अनिष्ठ परिणाम मानवतेवर होतो यासाठी संपूर्ण परिसरात ग्रीन वॉल तयार केल्या गेल्या आहेत.

उंची मूर्तीची स्पर्धा न लावता शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे तसेच शोभेसाठी वापरण्यात येणाऱ्या चीनी बनावटीच्या वस्तुंचा वापर टाळण्यासाठी बाप्पाचे दागिने कागदी बनावटीचे तयार करण्यात आले असून ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे अशी अंधमुले समाजाला अंधारमुक्त करू पाहत आहेत.त्यांचा ह्या वर्षीचा हा देखावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्यात येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा