Advertisement

पब्जी गेम बंद करा! ११ वर्षाच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना साकडं

तरूण पिढीला उद्धवस्त करणारा हा गेम बंद करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून उचलून धरली जात आहे. असं असतानाच एका लहानग्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित पब्जी बंद करण्याचं साकडं घातलं आहे.

पब्जी गेम बंद करा! ११ वर्षाच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना साकडं
SHARES

आधीची पिढी ही मैदानावर रमत होती, मैदानी खेळ खेळत मोठी होत होती. आताची नवी पिढी मात्र स्मार्टफोनच्या जाळ्यात अडकली आहे. अगदी एक-दीड वर्षाच्या मुलापासून ते काॅलेज तरूणापर्यंत सर्वाच्या हातात सध्या स्मार्टफोन दिसतो. त्यातही या स्मार्टफोनवर त्यांच्या हाताची बोटं चालतात ती गेम खेळण्यासाठीच. कॅण्डी क्रश, टेम्पल रन, सबवे सफरसारखे गेम खेळले जातातच. पण त्याही पुढं जात आता लहान मुल आणि तरूण आता पोकेमाॅन गो, ब्लू व्हे, मोमो चॅलेंडसारख्या जीवघेण्या गेमच्या आहारी जात आयुष्याचा खेळ करत आहेत. असाच एक जीवघेणा गेम सध्या मोठ्या संख्येनं तरूणांना आपल्या जाळ्यात ओढतो आहे. हा गेम आहे पब्जी गेम. या गेममध्ये मुलं इतकी अडकतायेत की त्यांना वेळेचं आणि अाजुबाजुच भानही राहत नाही. अभ्यास सोडून पब्जीच्या नादाला लागलेल्या मुलांवर प्रचंड मानसिक ताण पडत असून हा गेम हिंसेला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे तरूण पिढीला उद्धवस्त करणारा हा गेम बंद करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून उचलून धरली जात आहे. असं असतानाच एका लहानग्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित पब्जी बंद करण्याचं साकडं घातलं आहे.


पब्जी बंद करण्याची मागणी करणारं पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना साकडं घालणारा हा लहानगा आहे अहद नियाझ. अहद ११ वर्षाचा असून तो वांद्रयातील आर्य विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. अहदने मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर अगदी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही पत्र लिहित पब्जी बंद करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यावरच तो थांबलेला नाही तर त्यांना चक्क मायक्रोसाॅफ्ट आणि पब्जीचे सीईओ चंघन किम यांनाही असं पत्र पाठवलं आहे. तेव्हा या चिमुकल्याच्या आवाहनानंतर तरी हा गेम बंद होतो का? आणि तरूण पिढी सावरते का? हेच आता महत्त्वाचं ठरणार आहे.


दिवसभर पबजीमध्ये व्यस्त

गेल्या कित्येक वर्षांपासून ऑनलाईन गेमची संख्या वाढत असून पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज, पब्जी यासारख्या ऑनलाईन गेमच्या विळख्यात तरूणाई अडकत चालली आहे. यात दिवसभर पब्जी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा जास्त समावेश असून यामुळ तरूण पिढी हिंसक होत आहे. त्याशिवाय पुढील महिन्यांपासून दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे. या काळात मुलं पब्जी खेळत बसली तर नापास होतील या भितीमुळं जम्मू काश्मीर मधील विद्यार्थी संघटनेनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे पबजीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.


उच्च न्यायालयात याचिका?

पब्जीचे जीवघेणे परिणाम लक्षात घेता हा गेम शक्य तितक्या लवकर बंद होणं गरजेचं आहे. यात गेममध्ये बंदुक, बाॅम्ब यासारख्या शस्त्रांचा वापर करण्यात येत असल्यानं लहान मुलं आणि तरूण हिंसक विचारांकडे वळण्याची भिती वाढली आहे. त्यामुळे हा गेम येत्या काही दिवसांत बंद झाला नाही तर याविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ असा इशारा अहदच्या आईनं दिला आहे. अहदची आई वकील असून या पत्राची दखल न घेतल्यास आपण याविरोधात जनहित याचिका दाखल करू असाही उल्लेख अहदनं पत्रात केला आहे.



हेही वाचा -

आयआयटी मुंबईनं तयार केली दांडीयात्रेची शिल्पाकृती

मोदी गुरूजींची शाळा! परीक्षेच्या पलिकडेही खूप मोठं जग आहे, मोदींचा विद्यार्थ्यांना धडा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा