Advertisement

नवी मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी ६ शिष्यवृत्ती योजना

विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठीही 6 शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात आहेत.

नवी मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी ६ शिष्यवृत्ती योजना
SHARES

विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठीही 6 शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.

या आहेत योजना 

(1) विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

(2) आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.  

 (3) इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

(4) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

(5) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

(6) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम  / रेती / नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणे विद्यार्थी व पालकांना सुलभ व्हावे याकरिता सहजसोपी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2019-20 या वर्षातील शिष्यवृ्त्ती योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी अर्जासोबत केवळ नव्याने देणे आवश्यक आहे अशी गुणपत्रिका, शाळेचे शिफारसपत्र, उत्पन्न दाखला, शहारातील 3 वर्षांचे वास्तव्य ठिकाण बदलले असल्यास सध्याच्या रहिवासाचा पुरावा, कंत्राटदार / विभागप्रमुखाचे प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

तसेच 2019-20 च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या ज्या अर्जदारांना पुन्हा स्वेच्छेने अर्ज करावयाचा आहे त्यांना तो नव्याने सादर करता येईल. मात्र, ज्यांनी 2019-20 च्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा सन 2020-21 करिता नव्याने अर्ज करणा-या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

विविध घटकांतर्गत राबविण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्ती योजनांकरिता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व विभाग कार्यालये, नमुंमपा संचलित सर्व ग्रंथालये, समाजविकास विभाग कार्यालय, बेलापूर भवन, 1 ला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र..1, किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टऱ 15 ए, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई - 400614 या ठिकाणी शासकीय व सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत जमा करावयाचे आहेत. 31 ऑगस्ट रोजी सायं. 6.15 नंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा