Advertisement

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी जागा अधिक विद्यार्थी कमी

गेल्या काही वर्षांपासून खासगी कॉलेजांमध्ये अनेक जागा रिक्त राहत होत्या. मात्र आता अनुदानित व शासकीय कॉलेजांमध्ये जागा रिक्त राहत असल्यानं पॉलिटेक्निकलाही वाईट दिवस आले आहेत.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी जागा अधिक विद्यार्थी कमी
SHARES

 इंजिनीअरींगप्रमाणं पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाला यंदा विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला अाहे. यावर्षी जवळपास ७१ हजार ९०० जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांमधील ५ हजार जागा शासकीय आणि अनुदानित पॉलिटेक्निक कॉलेजांतील आहेत. यामुळे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी जागा अधिक विद्यार्थी कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


८० हजार जागा रिक्‍त

गेल्या काही वर्षांपासून खासगी कॉलेजांमध्ये अनेक जागा रिक्त राहत होत्या. मात्र आता अनुदानित व शासकीय कॉलेजांमध्ये जागा रिक्त राहत असल्यानं पॉलिटेक्निकलाही वाईट दिवस आले आहेत. गेल्यावर्षी पॉलिटेक्निकच्या तब्बल ८० हजार ८३५ जागा (५६.६४ टक्के) रिक्‍त राहिल्यानं अनेक शैक्षणिक संस्थेतील १९ हजार जागा कमी करण्यात आल्या होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षात १ लाख २३ हजार ५०९ जागा या अभ्यासक्रमसाठी होत्या. यापैकी ५१ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले अाहेत. तर गेल्यावर्षी ६१ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.


बीएमएस, बीएमएमकडे ओढा

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीस १६ जूनपासून सुरुवात झाली होती. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या कमी अाहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांचा आयटीआय, द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमाकडे, तर बारावीनंतर बी.एस्सी आयटी, बीएमएस, बीएमएम यांसारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमांतील प्रवेशाचा ओढा वाढल्यानं पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाला याचा फटका बसताना पहायला मिळत आहे.


वारेमाप फी 

 यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली असली तरीदेखील पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात फार कमी संधी उपलब्ध होत आहेत. तसंच अनेक शासकीय कॉलेजांसोबतच अनुदानित कॉलेजात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यानं खालच्या दर्जाचे शिक्षण यांमुळं विद्यार्थीही या कॉलेजांना फारशी पसंती देत नाहीत. संस्थाचालकांकडून घेण्यात येणारी वारेमाप फी आणि त्यातून मिळणारे शिक्षण यामुळे या अभ्यासक्रमाचं महत्त्व कमी होतं असल्याची टिका होत आहे.



हेही वाचा -

विद्यापीठाच्या ग्रंथालयासाठी ३ कोटीचा खर्च, सुविधांच्या नावाने मात्र बोंब

कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सुनिल भिरूड यांच्याकडं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा