Advertisement

व्यायाम करा आणि मार्क्स मिळवा!


व्यायाम करा आणि मार्क्स मिळवा!
SHARES

फास्टफूडचं अतिसेवन, सतत टीव्ही अाणि मोबाईलवर गेम खेळणं, आरामदायी राहणीमान यामुळं लहान मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढत चालल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) मंडळाने सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याची अनिवार्य केलं आहे. विशेष म्हणजे, हे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळांतर्फे ठरावीक गुणही मिळणार आहेत.


दररोज एक तास खेळासाठी

सीबीएसईच्या सर्व शाळांमध्ये दररोज एक तास खेळासाठी राखून ठेवण्यात येणार असून आरोग्य व शारीरिक शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी सीबीएसईने हे पाऊल उचलले आहे. सीबीएसईच्या सर्व शाळांना लवकरच १५० पानांची माहितीपुस्तिका देण्यात येणार असून या पुस्तकात इयत्ता नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना दररोज एक तास खेळासाठी सक्तीचा करण्यात येणार आहे. तसेच या पुस्तकात काही मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यांची अंमलबजावणीची माहितीही देण्यात येणार आहे. त्याशिवाय या माहितीपुस्तकेत शारीरिक कसरतीही दिल्या गेल्या आहेत.


असं होईल मूल्यमापन

या माहितीपुस्तिकेतील माहितीनुसार, सीबीएसईच्या शाळांतील विद्यार्थी दररोज क्रीडा तासाच्या वेळेत मैदानात जातील. त्यानंतर माहितीपुस्तकेत दिलेल्या शारीरिक कसरतींपैकी एक कसरत निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आले असून त्यापैकी एक कसरत विद्यार्थ्यांना करावी लागेल. त्यानंतरच विद्यार्थ्यांना गुण प्राप्त होतील. दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या कसरतीचं मूल्यमापन शाळेतील शिक्षकच करतील. मूल्यमापन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण शाळांमार्फत सीबीएसईच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येतील.


क्रीडा तासिकेला 'एचपीई' नाव

सीबीएसईच्या या क्रीडा तासिकेला आरोग्य आणि शारीरिक शिक्षण (Health and physical education) असे नाव देण्यात येणार असून २०१८-२०१९ च्या शैक्षणिक सत्रात त्यादृष्टीने बदल करण्याच्या सूचना सीबीएसई शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच दहावी व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना एचपीईच्या विषयात सहभागी होणे बंधनकारक असणार आहे. शालेय शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे शाळकरी मुलांना खेळाचे महत्त्व समजेल, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधता येईल.


हेही वाचा -

सीबीएसईची पुस्तकंही आता पीडीएफ स्वरूपात!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा