Advertisement

भूगोलाच्या गुणांचा फॉर्म्युला जाहीर, 'असे' मिळणार गुण

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं याबाबतचा निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

भूगोलाच्या गुणांचा फॉर्म्युला जाहीर, 'असे' मिळणार गुण
SHARES

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दहावीचा भुगोलाचा पेपर शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आला. परंतु, पेपर रद्द झाल्यानं गुणपत्रिका कशी असणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं याबाबतचा निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार, इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरी इतके गुण भूगोल विषयाला देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भूगोलाच्या रद्द झालेल्या पेपरची गुणपद्धतीसाठी मंडळाकडून प्रस्तान तयार करण्यात आला आहे. तसंच, हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्याला शासनाची मंजुरी मिळाल्याचं समजतं. त्यामुळं आता या गुणपद्धतीनुसार भूगोलाचे गुण देण्यात येणार आहेत. या गुणपद्धतीसाठी केवळ विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी पेपरचेच गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याचं समजतं.

१०वी व १२वीच्या परीक्षा झाल्यावर जूनच्या पंदरवड्यात निकाल जाहीर होतो. परंतु, यंदा कोरोनाचं सावट राज्यावर असल्यामुळं १०वी व १२वीचा निकाल जाहीर होण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं निकालासंबंधी काहीच माहिती मिळत नसल्यानं विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.



हेही वाचा -

राज्यातील शासकीय शाळांच्या दर्जात सुधारणा

व्हॉट्सअॅप असताना टेंशन कशाला, घरबसल्या करा सिलिंडर बुकिंग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा