Advertisement

महापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित

दरवर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू पुरविल्या जातात. मात्र, यंदा पालिका शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेली नाहीत.

महापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित
SHARES

दरवर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू पुरविल्या जातात. मात्र, यंदा पालिका शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेली नाहीत. निविदा प्रक्रियेला उशीर झाल्यानं ५० टक्के शाळांमध्ये अद्याप वस्तूंचा पुरवठाच झालेला नाही. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना दरवर्षी वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, बूट, पावसाळी सॅंडल, मोजे, डबा, पाण्याची बाटली अशा २७ शैक्षणिक वस्तू दिल्या जातात. मात्र, यंदा अनेक शाळांमध्ये या वस्तू मिळालेल्या नसल्याची माहिती समोर येत आहे.

शालेय वस्तू वाटपाला उशीर

महापालिका शाळेतील वह्यांच्या पुरवठादारानं यंदा एकही वही न मिळाल्यानं न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयानं या प्रकरणी पालिकेच्या तक्रार निवारण समितीकडं जाण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय डबा, पाण्याची बाटली अशा वस्तंच्या ऐवजी पैसे देण्याबाबत निर्णय न झाल्यानं त्या वस्तू देखील मिळालेल्या नाहीत. त्यामुळं अर्धे वर्ष संपलं तरी, वस्तू न मिळाल्यानं पालकांना पैसे खर्च करावे लागत आहे. तसंच, यामुळं अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय  होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं यावर्षी निविदा प्रक्रिया रखडल्यानं शालेय वस्तू वाटपाला उशीर झाल्याचं समजतं. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची बैठक बोलावत या वस्तू वेळेत देण्याची संबंधितांना ताकीद दिली आहे.

अनुदान योजना

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या अनुदान योजनेअंतर्गत पाण्याची बाटली, डबा, स्टेशनरी इत्यादी वस्तूंऐवजी पैसे देण्यात येणार होते. तसंच, हे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात  जमा करण्यात येणार होते. मात्र, याबाबतच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेनं विरोध करत ही रक्कम विद्यार्थ्यांचे पालक स्वत: खर्च करतील, असं म्हटलं होतं.

इत्यादी वस्तू मिळाल्या

  • बूट – ६१ टक्के शाळांमध्ये
  • गणवेश -१२ टक्के
  • सॅंडल – ५१ टक्के
  • दप्तर – ६६ टक्के
  • रेनकोट आणि छत्री – ९० टक्के
  • पालिकेच्या शाळा – ११९२
  • विद्यार्थी – २ लाख ९७ हजार



हेही वाचा -

दुरूस्तीच्या कामासाठी माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदत वाढ



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा