Advertisement

दुरूस्तीच्या कामासाठी माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद

मुंबईहून माथेरानला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेली माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे.

दुरूस्तीच्या कामासाठी माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद
SHARES

मुंबईहून माथेरानला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेली माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. जुलै महिन्यात पडलेल्या पावसाळ्यात नेरळ ते माथेरान दरम्यान २१ ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार असून त्यासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळं हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

रेल्वे सेवा बंद

पावसाळ्यातील ४ महिने नेरळ ते माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. मात्र, यंदा जुलै महिन्यात पडलेल्या पावसाळ्यामुळे नेरळ ते माथेरान मार्गावरील २१ ठिकाणी रुळांखालील खडी पूर्णपणे वाहून जाणे, दरड कोसळणे, रुळ सरकणे यासह अन्य मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला अनेक कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा संपताच पर्यटकांना मिनी ट्रेनचा आनंद लुटता येणार नाही.

समितीमार्फत सर्वेक्षण

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून, या मार्गाचं नेमण्यात आलेल्या एका समितीमार्फत सव्‍‌र्हेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार, आलेल्या अहवालानंतर त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडेही दुरस्तीसाठी लागणारा निधीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनि ट्रेन सेवा बंद ठेवली जाते. फक्त अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू असते. परंतु यंदा जुलै महिन्यातील पावसाळ्यात शटल सेवाही बंद ठेवावी लागली होती.



हेहा वाचा -

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवासाठी ३६४ गणेश मंडळांना परवानगी नाकारली

उद्धव ठाकरेंची मध्यस्ती निष्फळ, बेस्ट कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा