Advertisement

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवासाठी ३६४ गणेश मंडळांना परवानगी नाकारली

मुंबई उच्च न्यायालयाच्या अटींकडं दुर्लक्ष होत असल्यानं महापालिकेनं गणेश मंडळांना परवानगी देण्यास नकार दिला आहे.

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवासाठी ३६४ गणेश मंडळांना परवानगी नाकारली
SHARES

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करणं बंधनकारक आहे. त्यानुसार, मंडप बस स्टॉप, रेल्वे स्थानकाजवळ मंडप उभारू नये, मंडपात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यासाठी पुरेशी जागा हवी यांसारख्या अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. मात्र या अटींकडं दुर्लक्ष होत असल्यानं महापालिकेनं गणेश मंडळांना परवानगी देण्यास नकार दिला आहे.

१२ हजार गणेश मंडळं 

मुंबईत सुमारे १२ हजार गणेश मंडळं असून, तब्बल ३५०० मंडळ रस्त्यालगत मंडप उभारतात. मात्र, यामधील २३७३ परवाने वितरित करण्यात आले आहेत. तसंच, ३६४ मंडळांनी अनिर्वाय अटी पूर्ण न केल्यानं परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याशिवाय ३२८ अर्जांवर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे

ऑनलाइन अर्ज

मुंबईतील सर्व गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेकडं ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीदरम्यान अऩेक मंडळांनी अर्ज दाखल न केल्यानं ही मुदत २४ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती.

अर्जांबाबत माहिती

  • मंडप परवानगीसाठी आलेले अर्ज – ३७१८
  • छाननी पूर्ण झालेले अर्ज – ३०६५
  • परवानगी दिलेली मंडळ – २३७३
  • परवानगी नाकारलेली मंडळ -३६४
  • अर्जांवर कार्यवाही सुरू - ३२८



हेही वाचा -

उद्धव ठाकरेंची मध्यस्ती निष्फळ, बेस्ट कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु

गणेशोत्सवासाठी वेतन लवकर देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा