Advertisement

खुशखबर! सीबीएसईचे पेपर झाले सोपे

नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट व्हावी यासाठी सीबीएसई बोर्डाने या वर्षीपासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची संख्या वाढवण्यात आल्याने गत वर्षांच्या तुलनेत यंदाचे पेपर सोपे असणार आहेत.

खुशखबर! सीबीएसईचे पेपर झाले सोपे
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)ची बारावीची १५ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही परीक्षा इतर कोणत्याही बोर्डापेक्षा कठीण समजली जात असून, यात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट व्हावी यासाठी सीबीएसई बोर्डाने या वर्षीपासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची संख्या वाढवण्यात आल्याने गत वर्षांच्या तुलनेत यंदाचे पेपर सोपे असणार आहेत.


कशी असेल बदलेली प्रश्नपत्रिका?

दरवर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये १० टक्के ऑब्जक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येत होते. मात्र यंदाच्या परीक्षेपासून २५ टक्के ऑब्जक्टिव्ह प्रश्न असतील. त्याशिवाय या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल विद्यार्थी गोंधळले किंवा त्यांना उत्तर येत नसेल तर त्यांच्यासाठी पर्यायी प्रश्नही उपलब्ध असतील. इतकंच नव्हे तर विद्यार्थी ऑब्जक्टिव्ह प्रश्नांची वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं लिहू शकतील अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील.


ऑब्जेक्टिव्ह एका विभागात

प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होणार असून, त्यांना चांगले गुण मिळवणंही शक्य होणार आहे. नव्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचीा मांडणी सुटसुटीत असेल व सर्व प्रश्न विविध उपविभागांमध्ये विभागलेले असतील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न मात्र एकाच विभागात असतील. याखेरीज अधिक गुण असलेले प्रश्नही असतील.


नियंत्रकांचे रिअल टाईम ट्रॅकिंग

गेल्या वर्षी सीबीएसई बोर्ड दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्रचा पेपर फुटला होता. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी यंदा गोपनीय दस्तऐवज सांभाळणाऱ्या परीक्षा नियंत्रकांचं रिअल टाईम ट्रॅकिंग करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?

वांद्रे स्थानकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे 'हेरिटेज प्रदर्शन'



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा