Advertisement

बारावीचा सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर


बारावीचा सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर
SHARES

बारावी सीबीएसई बोर्डाचा रविवारी निकाल जाहीर झाला. मुंबईतल्या पोद्दार शाळेने निकालात बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतून पोद्दार शाळेची शमिका आनंद ही 98 टक्के गुण मिळवत मुंबईतून प्रथम आली आहे. तर वाणिज्य शाखेतून 97 टक्के मिळवणारा साहील भूषण हा आर.एन. पोद्दार शाळेचाच विद्यार्थी आहे.

मी मुंबईतून पहिला आलोय हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज झाले. माझ्या यशाच्या वाट्यात आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. यापुढे मला फाईन आर्टमध्ये करिअर करायचे आहे.

- साहिल भूषण

आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची तारीख सोमवारी 29 मे रोजी जाहीर होणार आहे. यावर्षी देशभरातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला 10 लाख 98 हजार 420 विद्यार्थी बसले होते.

रिझल्ट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -
cbse.nic.in, cbseresults.nic.in,

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय