Advertisement

CBSE च्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मागील आठवड्यात पोखरियाल यांनी ट्वीट करून ३१ डिसेंबरला सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांची घोषणा करू, असं सांगितलं होतं.

CBSE च्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
SHARES

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा ४ मे ते १५ जुलै या कालावधी होणार आहेत. केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली. परीक्षांचे निकाल १५ जुलैच्या आत लागतील, अशीही घोषणा त्यांनी केली.

कोरोनामुळे देशात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मागील आठवड्यात पोखरियाल यांनी ट्वीट करून ३१ डिसेंबरला सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांची घोषणा करू, असं सांगितलं होतं. या वर्षी परीक्षा फेब्रुवारीनंतरच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

परीक्षा नेहमीप्रमाणे पेन आणि पेपरवर होईल. ऑनलाइन स्वरूपाची नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सीबीएसईने याआधी  दहावी-बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. एकूण सिलॅबसच्या ३० टक्के वजा करून बहुतेक राज्य बोर्डाची परीक्षा घेणार आहेत. प्रत्यक्ष परीक्षेतही मुलांना ३३ टक्के अंतर्गत पर्यायांचे प्रश्न विचारण्यात येतील. मुलांचं आकलन तपासलं जाईल, असं पोखरियाल यांनी सांगितलं होतं.



हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा