Advertisement

सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक २ फेब्रुवारीला जाहीर होणार

२०२१ मधील सीबीएसईच्या परीक्षा लेखी पद्धतीने होतील असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने याआधीच स्पष्ट केलं होतं.

सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक २ फेब्रुवारीला जाहीर होणार
SHARES

केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड (सीबीईएसई) च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वेळापत्रक २ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परिक्षांच्या तारखांची घोषणा पोखरियाल निशंक यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ ची प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च रोजी होणार आहे. तर लेखी परीक्षा ४ मे रोजी सुरु होणार आहे. ह्या परीक्षा १० जूनपर्यंत सुरु राहतील. तर निकाल १५ जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. लवकरच सविस्तर वेळापत्रक लवकर वेबसाईटवर उपलब्ध होईल, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं. 

२०२१ मधील सीबीएसईच्या परीक्षा लेखी पद्धतीने होतील असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने याआधीच स्पष्ट केलं होतं. दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे, याला रमेश पोखरियाल निशंक यांनी दुजोरा दिला.



हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा