Advertisement

विद्यार्थ्यांनो आता फी भरा कधीही - यूजीसी

गेल्या अनेक वर्षांपासून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती देत आहेत. या अभ्यासक्रमाची फी भरमसाठ असून ती एकत्रित भरण्याची अट बहुतेक शैक्षणिक संस्था घालतात. त्यामुळे यूजीसीने यापुढे कोणत्याही शैक्षणिक संस्थांना संपूर्ण कोर्सची फी एकाच वेळी स्वीकारता येणार नाही, असा नियम केला आहे.

विद्यार्थ्यांनो आता फी भरा कधीही - यूजीसी
SHARES

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांसह कॉलेजांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं परीपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून संपूर्ण कोर्सची फी एकाच वेळेस स्वीकारता येणार नाही. यूजीसीच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना फी जमा करण्याबाबत दिलासा मिळाला आहे.

नवीन नियम

गेल्या अनेक वर्षांपासून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती देत आहेत. या अभ्यासक्रमाची फी भरमसाठ असून ती एकत्रित भरण्याची अट बहुतेक शैक्षणिक संस्था घालतात. त्यामुळे यूजीसीने यापुढे कोणत्याही शैक्षणिक संस्थांना संपूर्ण कोर्सची फी एकाच वेळी स्वीकारता येणार नाही, असा नियम केला आहे.

मूळ कागदपत्रे परत

याशिवाय यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी पडताळणीसाठी जमा केलेली मूळ कागदपत्रही तात्काळ परत करावी लागणार आहे. त्यामुळं गुणपत्रिका, शाळेचा दाखला, यांसह इतर कोणतीही कागदपत्र कॉलेज किंवा विद्यापीठाला तात्काळ परत करावी लागणार आहेत.

फी परत करावी लागणार

एवढंच नाही, तर एखाद्या विद्यार्थ्यानं प्रवेश रद्द केल्यानंतर किमान १५ दिवसांच्या आता शैक्षणिक संस्थांना फी परत करावी लागणार आहे. या निर्णयामुळं फी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अनेक संस्थांना चाप बसण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शैक्षणिक संस्थेला ५००० रूपयांपेक्षा जास्त रक्कम दंड म्हणून वसूल करता येणार नाही.हेही वाचा-

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा - रवींद्र वायकर

आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा