Advertisement

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा - रवींद्र वायकर

प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे राज्यातील उच्च शिक्षण व संशोधनाचा स्तर दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. ‘नॅशनल इस्टीट्युट रँकिंग'मध्ये आपल्या संस्थेच्या गुणांकनात वाढ करणं अडचणीचं झालं आहे. तरीही या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार वेगानं पावलं उचलत नसल्यानं अनेक संघटंनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा - रवींद्र वायकर
SHARES

राज्यातील विविध विद्यापीठांसह कॉलेजातील प्राध्यापकांच्या जागा मागील बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळं उच्च शिक्षणाचा दर्जा खालवण्याची शक्यता असून या रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी राज्य सरकारने शासनस्तरावर निर्देश द्यावेत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

संशोधनाचा स्तर ढासळतोय

प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे राज्यातील उच्च शिक्षण व संशोधनाचा स्तर दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. ‘नॅशनल इस्टीट्युट रँकिंग'मध्ये आपल्या संस्थेच्या गुणांकनात वाढ करणं अडचणीचं झालं आहे. तरीही या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार वेगानं पावलं उचलत नसल्यानं अनेक संघटंनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केवळ आश्वासन

यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत मोठ्या प्राध्यापकांच्या रिक्त जागांबाबत चर्चा करण्यात आली होती. याप्रश्‍नी तात्काळ निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी बैठकीत मान्य केलं होतं. परंतु त्यानंतरही प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासन वेगाने पावले उचलत नसल्याचं दिसून येत आहे.

राज्यपालांनी लक्ष घालावं

दरवेळी अधिवेशनात विविध आमदारांकडून प्राध्यापकांच्या रिक्त जागांसंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात येतो. परंतु त्याचं नेमकं उत्तर देणं सरकारला शक्य होत नाही. त्यामुळे राज्यपालांनी स्वत: या प्रश्नी लक्ष घालून प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी राज्यपालांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा-

टीईटी परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार

प्राध्यापकांचं कामबंद आंदोलन अखेर मागे; बहुतांश मागण्या पूर्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा