Advertisement

टीईटी परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार

या संपूर्ण प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी जुलै महिन्यात परीक्षा झाल्यानंतर तेव्हाच केंद्र संचालक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं मानधन निरीक्षक कार्यालयांना पाठवल्याचा खुलासा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला. असं असेल, तर २ महिन्यांपासून निरीक्षक कार्यालय शिक्षकांना मानधन देण्यात दिरंगाई का करत आहे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

टीईटी परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार
SHARES

गेल्या ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येते. परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षात टीईटी परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांना २ महिने उलटूनही मानधानाची रक्कम न मिळाल्यानं या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मुंबईतील शिक्षकांनी घेतला आहे.


शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा

गेल्या ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. जुलै महिन्यात ही परीक्षा होत असून राज्यातल्या विविध परीक्षा केंद्रात ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षांसाठी काही ठराविक मानधनावर पर्यवेक्षक नेमण्यात येतात. यंदाच्या वर्षीही जुलै महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. त्यांच्यासाठी पर्यवेक्षकही नेमण्यात आले होते.


मानधनासाठी प्रतिक्षा

ही परीक्षा झाल्यानंतर तातडीनं मानधान मिळणं अपेक्षित होतं. मात्र २ महिने उलटूनही या केंद्रावर काम करणाऱ्या केंद्र संचालक, पर्यवेक्षकांना मानधन न मिळाल्याने पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिक्षण परीषदेनं घेतला आहे.


जुलैतच मानधन

या संपूर्ण प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी जुलै महिन्यात परीक्षा झाल्यानंतर तेव्हाच केंद्र संचालक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं मानधन निरीक्षक कार्यालयांना पाठवल्याचा खुलासा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला.


पैसे गेले कुठे?

असं असेल, तर २ महिन्यांपासून निरीक्षक कार्यालय शिक्षकांना मानधन देण्यात दिरंगाई का करत आहे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिवाय मानधनाचे पैसे गेले कुठे? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.



हेही वाचा-

हजारो शिक्षकांना वेतनवाढीचा दिलासा

प्राध्यापक संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा