Advertisement

महाराष्ट्रात २० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू, 'ही' आहे नियमावली

राज्यातील कॉलेज येत्या २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात २० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू, 'ही' आहे नियमावली
SHARES

राज्यातील कॉलेज येत्या २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी उदय सामंत यांनी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसंच कॉलेज, विद्यापीठांसाठी असलेल्या नियमावलींची माहिती देखील दिली.

‘ही’ आहे नियमावली

  • विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन तिथल्या प्राधिकारणाशी चर्चा करुन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मोठ्या पद्धतीने लसीकरणाचे काम विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या प्रांगणात करावे.


  • ज्या क्षेत्रात कोरोना असू शकतो, कोरोना कमी झालाय किंवा कोरोना वाढू शकतो त्या क्षेत्रातले आयुक्त, महापालिका किंवा जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या कोविड 19 आजाराचा स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून विद्यापीठ आणि प्राधिकरणाने पुढचे निर्णय घ्यावे.


  • तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा.


  • काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हीच नियमावली लागू करायची की नाही याबाबत स्थानिक प्रशासनानx निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी नियमावली असू शकते.


  • ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणं शक्य होणार नाही त्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करून द्यायची आहे.


  • ज्या विद्यार्थ्यांनी कोविड १९ ची लस घेतली नाही त्यांच्याकरता विद्यापीठानं संबंधित संस्थांचं प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीनं स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून विशेष लसीकरण मोहिम राबवावी.


  • टप्प्याटप्प्यानं वसतीगृह उघडण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण ही सुरू करत असताना मुंबई उच्च शिक्षण संचालक आणि पुण्याचे उच्च शिक्षण संचालकांनी यांनी पूर्ण वसतीगृहांचा आढावा घ्यायचा आहे.


  • शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आऊटसोअर केलेला स्टाफ जो विद्यालयात काम करतो त्यांचं शंभर टक्के लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे.हेही वाचा

शाळेच्या पहिल्या दिवशी ३५-४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

MPSC Exam: २ जानेवारीला पूर्व परीक्षा; आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा जाहिरात प्रसिद्ध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा