Advertisement

विद्यापीठात रखडलेलं संशोधन केंद्र लवकरच उभारणार

डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र लवकरच मुंबई विद्यापीठात उभारणी केली जाणार आहे. मंगळवारी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने आमरण उपोषणाची हाक देत विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधलं.

विद्यापीठात रखडलेलं संशोधन केंद्र लवकरच उभारणार
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र लवकरच मुंबई विद्यापीठात उभारणी केली जाणार आहे. मंगळवारी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने आमरण उपोषणाची हाक देत विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधलं.


कुलसचिवांनी दिलं आश्वासन

विद्यापीठ प्रशासनाने याबाबत ताबडतोब दखल घेत येत्या जून महिन्यापासून रखडलेल्या आतंरराष्ट्रीय संशोधन केंद्राची उभारणी लवकरात लवकर करण्यात येईल, असं आश्वासन प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दिलं आहे.


तरी मुहूर्त मिळाला नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर आधारित समाजरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी, मुंबई विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र विद्यापीठात उभारण्यात येणार होतं.


विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या कालावधीत संबंधित जागेचं जून २०१५ साली उद्घाटनही करण्यात आलं. दरम्यान, प्रस्ताव मंजूर होऊन दोन वर्षे उलटली, तरी या केंद्रास मुहूर्त न मिळल्याने रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने मंगळवारपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती.


त्यामुळे उपोषण तात्पुरतं स्थगित

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केलेल्या या उपोषणाला यश मिळालं असून, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी, त्वरित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र मुंबई विद्यापीठात उभं राहील आणि त्यासंदर्भात पुढील अंमलबजावणीही त्वरित करण्यात येईल, असं आश्वासन कलिना कॅम्पसमध्ये येऊन दिलं आहे. त्यामुळे हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे.


तर तीव्र आंदोलन

विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची उभारणी करण्याचा प्रस्ताव जून २०१५ ला मान्य करण्यात आला होता. त्यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात दरवर्षी १० लाखांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, गेली ३ वर्षे हा निधी प्राप्त झाल्यानंतरही यातील एकही रुपया अद्याप संशोधन केंद्रासाठी वापरण्यात आलेला नाही. सध्या आम्हाला विद्यापीठ प्रशासनातर्फे हे केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. परंतु जर हे आश्वासन पूर्ण केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार.
- आशिष गाडे, अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना


हेही वाचा - 

विद्यार्थ्यांची भूक मुंबई विद्यापीठाला दिसेना! मेस केली परस्पर बंद!

विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ अद्याप सुरूच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा