Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, समाजशास्त्रात नाहीत नववीचे प्रश्न

नुकतंच शिक्षण मंडळानं याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं असून, त्यानुसार समाजशास्त्र विषयात नववीच्या अभ्यासक्रमावर २० टक्के भारांशाचे प्रश्न विचारले जाणार नाहीत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, समाजशास्त्रात नाहीत नववीचे प्रश्न
SHARES

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावी बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित २० टक्के प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. याला विद्यार्थी पालक आणि शिक्षण तज्ज्ञांनीही विरोध दर्शवला होता. मात्र नुकतंच शिक्षण मंडळानं याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं असून, त्यानुसार समाजशास्त्र विषयात नववीच्या अभ्यासक्रमावर २० टक्के भारांशाचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. यामुळे दहावीच्या परीक्षेस बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.


काय आहे निर्णय?

यंदा शिक्षण मंडळानं दहावीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित, समाजशास्त्र यांसारख्या सर्व विषयांमध्ये इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित २० टक्के प्रश्न विचारण्यात येणार होते. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.


विद्यार्थ्यांना दिलासा

अखेर शिक्षण मंडळाने याबाबत सुधारीत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सुधारीत परिपत्रकानुसार भाषा विषयात इयत्ता नववीतील उपयोजित लेखन व व्याकरण या विषयावरील २० टक्के प्रश्न विचारले जाणार आहेत. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ आणि भाग २ यामध्ये नववीतील मुलभूत ज्ञान विचारात घेतलं जाणार आहे. तसंच गणित भाग १ आणि २ या विषयांमध्ये नववीच्या अभ्यासक्रमावर २० टक्के प्रश्न विचारण्यात येतील. परंतु इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल या विषयांत मात्र २० टक्के प्रश्न विचारले जाणार नसल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. शिक्षण मंडळानं घेतलेल्या या निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत तापमानाची रस्सीखेच, पारा १२ अंशावर

एसटीमध्ये ८,०२२ चालक-वाहक पदांची भरती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा