Advertisement

कोकणातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ


कोकणातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ
SHARES

कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. या पुरस्थितीमुळं कोकणातील रहिवासांचं आर्थिक नुकसान झालं असून घरातील सर्व सामना पुराच्या पाण्यात वाहून गेलं. त्यामुळं कोकणातील पुरग्रस्तांची ही स्थिती लक्षात घेत पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येणार आहे.

हेही वाचा - आता ऑनलाइन PAN कार्ड मिळणार

परीक्षा शुल्क 

मुंबई विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कोकणातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शैक्षणिक शुल्क माफ करावं, अशी मागणी अधिसभेत करण्यात आली. यानुसार विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिलं.

अंतिम निर्णय

याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊन परिपत्रक काढण्यात येणार आहे. तसंच, त्यात तपशील दिला जाणार असल्याचं कुलगुरूंनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यातील सर्व विद्यापीठांनी अशी शुल्क माफी द्यावी, यासाठी युवा सेनेचं शिष्टमंडळ लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

यंदाही आयपीएलच्या उद्घाटन सोहळा रद्द

‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ - संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा