सेवासमाप्त शिक्षणसेवकांची प्रतीक्षायादी होणार, मोठा दिलासा!

  अतिरिक्त ठरलेल्या व सेवासमाप्त केलेल्या शिक्षण सेवकांची प्रतीक्षा यादी बनविली जाणार असून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

  Mumbai
  सेवासमाप्त शिक्षणसेवकांची प्रतीक्षायादी होणार, मोठा दिलासा!
  मुंबई  -  

  अतिरिक्त ठरलेल्या व सेवासमाप्त केलेल्या शिक्षण सेवकांची प्रतीक्षा यादी बनविली जाणार असून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

  शैक्षणिक वर्ष २०१३-१४ व २०१४-१५ यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या आणि सेवासमाप्त केलेल्या शिक्षण सेवकांची नावे तातडीने शिक्षण विभागाकडे देण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत. या शिक्षण सेवकांना तातडीने सेवेत रुजू करावे, यासाठी राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती.


  रिक्त जागांवर शिक्षण सेवकांना सामावून घेणार

  शिक्षण सेवकांची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित सेवेत सामावून घेऊन नियमित वेतनश्रेणी देण्यात येते. परंतु शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याच्या आधी जर शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाली, तर त्याचा फटका शिक्षण सेवकाला बसून त्याची सेवा समाप्त करण्यात येते.

  याबाबत शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे अतिरिक्त शिक्षण सेवकांना रिक्त जागी सामावून घेण्याबाबत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

  शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करून शिक्षण सेवकांना रिक्त पदांवर सामावून घ्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.


  शिक्षण सेवक कायद्यात दुरुस्ती करावी

  ज्याप्रमाणे नियमित शिक्षकांना अतिरिक्त झाल्यावर सेवासंरक्षण व वेतनसंरक्षण मिळते, त्याचप्रमाणे एखादा शिक्षणसेवक तीन वर्षांचा कालावधी संपण्याच्या आधीच जर अतिरिक्त होत असेल, तर अशा शिक्षण सेवकांना सेवेत सामावून घेऊन वेतन संरक्षण देण्यात यावे, यासाठी शिक्षण सेवक कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.  हेही वाचा

  शिक्षणाच्या आयचा घो! कंत्राटी शिक्षकापेक्षा सफाई कामगाराचा पगार दुप्पट!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.