Advertisement

आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा
SHARES
Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  त्यानुसार, विद्यार्थी २० सप्टेंबपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. बी.कॉम, बी.एस्सी आयटी, एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमए आणि एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. हे प्रवेश अर्ज http://idoloa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


पूरस्थिती निर्माण

मुसळधार पावसामुळं देशभरातील विविध राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं दूरशिक्षण संस्थांची प्रवेश पक्रिया पूर्ण होण्यास अडथळे येत होते. दरम्यान, प्रवेशास मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची भीती असून, त्यामुळं प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील सर्व दूर व मुक्त अध्ययन संस्थांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सप्टेंबर अखेपर्यंत मुदत दिली आहे.


६५ हजार प्रवेश

आयडॉलमध्ये आतापर्यंत ६५ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. यामधील ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहेत. वाणिज्य शाखेत सर्वाधिक ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. कला शाखेतील बीए व एमए या अभ्यासक्रमासाठी १८ हजार २६३ विद्यार्थ्यांनी तसंच, विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेत १ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.हेही वाचा -

लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झालेल्या सोन्या, चांदीचा होणार लिलाव

शर्मिला ठाकरेंनीही केला आरे कारशेडचा विरोधसंबंधित विषय
Advertisement