लालबागच्या राजाच्या दानपेटीत ९ दिवसांतच 'इतकी' रक्कम जमा!

यंदा लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी रोख रक्कम, सोनं, चांदी याप्रकारचं दान मोठ्या प्रमाणात टाकलं आहे. या सोन्या चांदीच्या वस्तूचा लिलाव भाविकांसाठी सोमवारी आयोजित केला असून संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.

SHARE

यंदा लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी रोख रक्कम, सोनं, चांदी याप्रकारचं दान मोठ्या प्रमाणात टाकलं आहे. या दानपेटीची आता मोजणी सुरू असून आतापर्यंत पहिल्या ९ दिवसांची रक्कम मोजण्यात आली आहे. यामध्ये ५ कोटी ५ लाख ३० हजार रोख रुपये जमले आहेत. तसंच, किलो ६६५ ग्रॅम सोनं, ५६ किलो ७१६ ग्रॅम चांदी जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. या सोन्या चांदीच्या वस्तूचा लिलाव भाविकांसाठी सोमवारी आयोजित केला असून संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.

भक्तांची मोठी गर्दी

'नवसाला पावणारा' राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात दान जमा होतं. तसंच, या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात मुंबईसह देशभरातील गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात मोठी गर्दी करतातदर्शनासाठी आलेले भाविक राज्याच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान टाकतात, दानपेटीत गणेशभक्तांनी सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम टाकतात. यंदाच्या गणेशोत्सवात दानपेटीत जमा झालेल्या नोटांची मोजणी सध्या सुरु आहे. ९० जणांची टीम मोजणीसाठी कार्यरत असून यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, सल्लागार यांचा समावेश आहे.

सोन्याची विट अर्पण

यंदा एका भाविकांनं सोन्याचं ताट, २ वाट्या, एक ग्लास, २ चमचे राजाच्या दान पेटीत अर्पण केले. तर एका भाविकानं सोन्याची विट अर्पण केली आहे. दानपेटीत चांदीच्या आकर्षक वस्तू आल्या आहेत. एका भाविकाने तब्बल अर्धा किलो वजनाची पावले राजाच्या चरणी जमा केली आहेत.हेही वाचा -

आरेतील मेट्रो कारशेडला मनसे, काँग्रेसचाही विरोध

यंदा मुंबईसह राज्यभरात विक्रमी पावसाची नोंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या