Advertisement

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी २२ जुलैला होणार जाहीर

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीने नव्वदी पार केल्यानंतर आता विद्यार्थीचं लक्ष दुसऱ्या गुणवत्ता यादीकडं लागलं आहे. दुसरी यादी २२ जुलै रोजी जाहीर होणार असून, या यादीसाठी आॅनलाइन प्रवेशाच्या एकूण १ लाख ३३ हजार २४५ जागा उपलब्ध आहेत.

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी २२ जुलैला होणार जाहीर
SHARES

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीने नव्वदी पार केल्यानंतर आता विद्यार्थीचं लक्ष दुसऱ्या गुणवत्ता यादीकडं लागलं आहे. दुसरी यादी २२ जुलै रोजी जाहीर होणार असून, या यादीसाठी आॅनलाइन प्रवेशाच्या एकूण १ लाख ३३ हजार २४५ जागा उपलब्ध आहेत. उपलब्ध जागांपैकी कला शाखेसाठी १६ हजार ७१०, वाणिज्य शाखेसाठी ७२ हजार ४९२, विज्ञान शाखेसाठी ४१ हजार १७४ तर एचएसव्हीसीसाठी २,८६९ जागा आहेत.

जागांची स्थिती

पहिल्या फेरीत अलॉट १ लाख ३४ हजार ४६७ जागांपैकी ७२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतरची जागांची स्थिती उपसंचालक कार्यालयाकडून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या माहितीच्याआधारे दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ आणि भाग २ दुरुस्ती करायची असल्यास तसेच पसंतीक्रम बदलण्यासाठी गुरुवार १८ जुलै रोजी शेवटची संधी असणार आहे.

कोट्याच्या जागाही जाहीर

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कोट्याच्या जागाही जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी अल्पसंख्याक महाविद्यालयांत एकूण २० हजार ९६९, व्यवस्थापन कोट्यासाठी ४,६८१ तर इनहाउस कोट्याच्या ३,५९० जागा उपलब्ध आहेत.हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या मोटरमननं लघुशंकेसाठी थांबवली लोकल

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय - चंद्रकांत पाटीलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा