नो टेन्शन! एफवायच्या अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी

 Mumbai
नो टेन्शन! एफवायच्या अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी

एफवायच्या प्रवेशासाठी सगळीकडे चांगलीच चुरस रंगलेली आहे. एफवाय प्रवेशाची दुसरी यादी बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. परंतु दुसरी यादीही 80 टक्क्यांच्या वर लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


81 महाविद्यालयांत अतिरिक्त तुकड्या

मात्र, विद्यार्थ्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण सरकारने राज्यभरातील विविध विद्यापीठांमधील 81 महाविद्यालयांत अतिरिक्त तुकड्यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेशा जागा उपलब्ध असतील.


उत्तीर्ण विद्यार्थी वाढल्याने निर्णय

राज्य सरकारने यंदा एकाही नव्या महाविद्यालयाला मान्यता न देण्याचे जाहीर केले होते. परंतु यावर्षी बारावीचा निकाल चांगला लागल्यामुळे प्रवेशासाठी चांगली चढाओढ रंगली होती. त्यामुळे विविध विद्यापीठांनी अतिरिक्त तुकड्यांसाठी अर्ज केले होते. या अर्जानुसार अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.


मुंबईत 29 महाविद्यालयांचा समावेश

या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न 29 महाविद्यालयांना अतिरिक्त तुकड्यांची परवानगी देण्यात आली आहे. तर, एसएनडीटी महिला विद्यापीठालाही एका अतिरिक्त तुकडीची मान्यता देण्यात आली आहे. के. सी. केळकर, वर्तक, बिर्ला अशा अनेक महाविद्यालयांचा यात समावेश आहे.हे देखील वाचा -

बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीरडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments