Advertisement

मराठी अध्यापक संघाच्या त्रैमासिकाचं अनुदान पुन्हा सुरू


मराठी अध्यापक संघाच्या त्रैमासिकाचं अनुदान पुन्हा सुरू
SHARES

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी त्रैमासिकांचं बंद झालेले अनुदान महाराष्ट्र मराठी अध्यापकांच्या मागणीमुळं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा सुरू केलं आहेत. मराठी विषयाच्या विकासासाठी व विस्तारासाठी, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी गेल्या ३७ वर्षांपासून महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ विविध कार्य करत आहे.


३७ वर्षांपासून त्रैमासिक

 महाराष्ट्र मराठी अध्यापक संघातर्फे एक त्रैमासिकही ३७ वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून आतापर्यंत २४ मान्यवर साहित्यिकांचे विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. वि स खांडेकर, आचार्य विनोबा भावे, यदुनाथ थत्ते, साने गुरुजी, यशवंत, कुसुमाग्रज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बा सी मर्ढेकर, कविवर्य कुसुमाग्रज, यशवंतराव चव्हाण, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, इरावती कर्वे, विभावरी शिरूरकर, ग.ह. पाटील, श्यामची आई (यशोदा), गो.नी. दांडेकर यांसारख्या विविध साहित्यिकांवर हे विशेषांक प्रसिद्ध झाले आहेत. 


अनुदान बंद

या त्रैमासिकाला शासनमान्यता असून गेल्या दोन वर्षांपासून या त्रैमासिकाचं अनुदान बंद करण्यात आलं होतं. हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावं यासाठी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात येईल अस आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे हे अनुदान तात्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती अनिल बोरनारे यांनी दिली. दरम्यान, हे अनुदान सुरू करण्यात आल्यानं राज्यातील मराठी विषय शिक्षकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आभार मानले आहेत.हेही वाचा - 

जाणीव महोत्सवासाठी साठ्ये कॉलेज सज्ज

अकरावी प्रवेशावेळीच करता येणार जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा