Advertisement

विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुरवणी मिळणार..!


विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुरवणी मिळणार..!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाला अखेर उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. यासंदर्भात नवीन निर्णय जारी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत. शनिवारपासून विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होत असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्यात जारी केलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेत पुरवणी किंवा अतिरिक्त उत्तरपत्रिका घेण्यास मनाई करण्यात अाली आहे. या निर्णयाविरोधात मानसी भूषण या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.



किती पानांची उत्तरपत्रिका?

विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी सुमारे ३७ पानांची उत्तरपत्रिका देण्यात येते. उत्तरपत्रिका आणि पुरवणीच्या बारकोडमध्ये तफावत असल्यामुळे तपासणीच्या कामात यापूर्वी गोंधळ झाला होता. त्यानुसार ऑनलाईन गुण तपासणी पद्धतीमध्ये अतिरिक्त पुरवणी अडथळा ठरत असल्याचं स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आलं होतं. त्यावर विद्यापीठाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले.

या संदर्भातील सुनावणी दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या पुरवणी न देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली असून नवीन निर्णय जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. शनिवारपासून विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होत आहेत. तरी प्रशासनाने तत्काळ सर्व महाविद्यालयांना परीक्षेदरम्यान उत्तरपत्रिकेसह पुरवणी देण्याचे आदेश जारी करण्याची मागणी याचिकाकर्ती मानसी भूषण हिने केली आहे.


परीक्षा सुरु होण्यापूर्वी माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी सध्या तरी समाधानी आहे. आता मी उद्याच्या परीक्षेची तयारी करत असून या निर्णयाचा मला आणि इतर विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.

- मानसी भूषण, याचिकाकर्ती



हेही वाचा-

अभ्यासक्रम पूर्ण नसतानाच परीक्षांचा घाट, विद्यापीठाचा नवा गोंधळ

विद्यार्थ्यांनो टेन्शन नाॅट! परीक्षा शुल्कात ६० ते ८० टक्के कपात


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा