Advertisement

बारावीचा निकाल 'या' ४ वेबसाईटवर पाहा, 'असा' पाहा निकाल

यामुळे एकाच वेबसाईटवर लोड येणार नसून विद्यार्थ्यांना निकाल पाहणं आणखी सोपं जाणार आहे.

बारावीचा निकाल 'या' ४ वेबसाईटवर पाहा, 'असा' पाहा निकाल
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE)बारावीचा निकाल अखेर मंगळवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे.

दहावीच्या निकालावेळी मंडळाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्यानं हजारो विद्यार्थ्यांना कित्येक तास त्यांचा निकाल पाहता आला नव्हता. बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील असा त्रास सहन करावा लागू नये म्हणून बोर्डानं एक मार्ग काढला आहे. त्यामुळे मंगळवारी जाहीर होणाऱ्या इयत्ता बारावीच्या निकालासाठी बोर्डानं चार नव्या वेबसाईटची स्वतःहून दिल्या आहेत. त्यामुळे एकाच वेबसाईटवर लोड येणार नसून विद्यार्थ्यांना निकाल पाहणं आणखी सोपं जाणार आहे.


कुठे पाहता येणार निकाल?

1) https://hscresult.11thadmission.org.in

2) https://msbshse.co.in

3) http://hscresult.mkcl.org/

4) https://mahresult.nic.in/

याशिवाय www.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in  या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येईल असं मंडळानं स्पष्ट केलं आहे.


कसा पाहाल निकाल?

  • वरीलपैकी एका वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • सिट नंबर टाका.
  • विचारलेली योग्य माहिती द्या. (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
  • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • निकालाची प्रिंटआऊटही काढता येईल.


निकाल कसा लागणार?

दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. तर इयत्ता अकरावीचा ३० टक्के भारांश असणार आहे. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण बारावीच्या निकालात देण्यात येणार आहेत.

तर इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश असेल. बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. तसेच त्यांची प्रिंन्टही घेता येणार आहे असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.


... म्हणून निकालासाठी विलंब

कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागण्यात आली होती. अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा २०२१ उच्च माध्यमिक बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी ४ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.



हेही वाचा

नवी मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी ६ शिष्यवृत्ती योजना

अरे व्वा! आता मराठीसह 'या' पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा